ambegaoneduheader

Saturday, 17 August 2013

आंबेगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची वेबसाईट सुरु....

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र नाविन्यपूर्ण संकल्पनांची घौडदौड सुरु आहे. आपल्या शिक्षण विभाग ही यात मागे न राहता. ईमेल आयडी, फेसबुक, ब्लॉग यांच्या बरोबरच वेबसाईट च्या माध्यमातून सादर होत आहे. वेबसाईटची हि संकल्पना आपल्या समोर सादर करताना विलक्षण आनंद होत आहे.
        या वेबसाईट मध्ये आपण प्रामुख्याने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची इतम्भूत माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यात प्रामुख्याने व्यवस्थापन निहाय शाळा माहिती, केंद्रानुसार शिक्षक माहिती, आस्थापना, बांधकाम माहिती, कार्यालयीन आदेश, तालुक्यातील पदाधिकारी, शिक्षण विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, शासनाच्या विविध योजना, पटसंख्या, शिक्षण विभागाच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालाबाबत माहिती, शिक्षण विभागांतर्गत शाळांना केलेल्या भौतिक सुविधा त्याचप्रमाणे शाळाभेटी व उपक्रम याबाबतची चालू माहिती ब्लॉगच्या स्वरुपात आपल्या समोर सादर करणार आहोत.
                  फक्त शिक्षण विभागाचीच वेबसाईट न बनविता आपण समाविष्ट सर्व शाखांना वेबसाईट बनविण्याचे आव्हाहन करीत आहोत. जेणेकरून या तालुक्यातील प्रत्येक शाळा हि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असेल. विशेष म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा मायबोली मराठीत ही वेबसाईट असल्याकारणाने तळागाळातील सर्व जनमानसांपर्यंत शिक्षण विभागाच्या कामाची माहिती पोहचेल.
                 आपणाला नक्कीच हा नाविन्यपूर्ण उपक्रम आवडेल अशी अपेक्षा करतो.
==========================================================================
श्री.संजय दत्तात्रय नाईकडे
गटशिक्षणाधिकारी,
आंबेगाव तालुका शिक्षण विभाग