ambegaoneduheader

Sunday, 22 December 2013

शाळांनी आता तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा - गटशिक्षणाधिकारी

२ डिसेंबर २०१३
                 
                      पंचायत समिती  शिक्षण विभागाच्या वेबसाईट अनावरण प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा श्री. संजय नाईकडे यांनी नमूद केले की, तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार लक्षात घेता शिक्षण विभागातील शाळांनी तंत्रज्ञानाचा वापर करून एक नवा आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रत्येक शाळेची स्वतंत्र वेबसाईट असली पाहिजे.  ज्यामध्ये शाळेची माहिती, शैक्षणिक सुविधा, राबविले जाणारे उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता आलेख, शाळेचे फोटो यांसारख्या विविध बाबी नमूद करता आल्या पाहिजे.

शिक्षण विभागाच्या वेबसाईटचे ऑफिसीअल लाँचिंग....

२ डिसेंबर २०१३

                    पंचायत समिती आंबेगावच्या शिक्षण विभागाच्या वेबसाईटचे ऑफिशियल लाँचिंग २ डिसेंबर २०१३ रोजी मंचर मधील उर्दू माध्यमिक व डी.एड विद्यालयात झाले. या अनावरणाच्या प्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. सुषमाताई शिंदे, व्याख्याते मा.श्री. गुलाबराव वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री. विवेक इलमे, सकाळ पत्रकार संघाच्या ग्रामीण विभागाचे अध्यक्ष मा.श्री. डी.के.वळसे सर, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री. संजय नाईकडे, विस्तार अधिकारी, अन्य मान्यवर आणि उपस्थित केंद्रप्रमुख, शिक्षक अध्यापक वर्ग हे उपस्थित होते.
                  तब्बल ७५ पाने असलेली हि वेबसाईट  शिक्षण विभागाची सर्वात मोठी वेबसाईट ठरू शकेल अशी अशा यावेळी पाहुण्यांनी व्यक्त केली. हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आणि शिक्षण विभागातील शिक्षकांना कल्पना मिळावे या साठी हे लाँचिंग केले असून लवकरच यात योग्य ते फेरबदल करून या वेबसाईटचे योग्य त्या प्रकारे अनावरण करण्याचे आश्वासन गटशिक्षण अधिकारी मा.श्री.संजय नाईकडे यांनी दिले.

Saturday, 17 August 2013

आंबेगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची वेबसाईट सुरु....

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र नाविन्यपूर्ण संकल्पनांची घौडदौड सुरु आहे. आपल्या शिक्षण विभाग ही यात मागे न राहता. ईमेल आयडी, फेसबुक, ब्लॉग यांच्या बरोबरच वेबसाईट च्या माध्यमातून सादर होत आहे. वेबसाईटची हि संकल्पना आपल्या समोर सादर करताना विलक्षण आनंद होत आहे.
        या वेबसाईट मध्ये आपण प्रामुख्याने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची इतम्भूत माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यात प्रामुख्याने व्यवस्थापन निहाय शाळा माहिती, केंद्रानुसार शिक्षक माहिती, आस्थापना, बांधकाम माहिती, कार्यालयीन आदेश, तालुक्यातील पदाधिकारी, शिक्षण विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, शासनाच्या विविध योजना, पटसंख्या, शिक्षण विभागाच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालाबाबत माहिती, शिक्षण विभागांतर्गत शाळांना केलेल्या भौतिक सुविधा त्याचप्रमाणे शाळाभेटी व उपक्रम याबाबतची चालू माहिती ब्लॉगच्या स्वरुपात आपल्या समोर सादर करणार आहोत.
                  फक्त शिक्षण विभागाचीच वेबसाईट न बनविता आपण समाविष्ट सर्व शाखांना वेबसाईट बनविण्याचे आव्हाहन करीत आहोत. जेणेकरून या तालुक्यातील प्रत्येक शाळा हि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असेल. विशेष म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा मायबोली मराठीत ही वेबसाईट असल्याकारणाने तळागाळातील सर्व जनमानसांपर्यंत शिक्षण विभागाच्या कामाची माहिती पोहचेल.
                 आपणाला नक्कीच हा नाविन्यपूर्ण उपक्रम आवडेल अशी अपेक्षा करतो.
==========================================================================
श्री.संजय दत्तात्रय नाईकडे
गटशिक्षणाधिकारी,
आंबेगाव तालुका शिक्षण विभाग