ambegaoneduheader

Monday, 9 June 2014

सातवी स्कॉलरशिपचे निकाल जाहीर...

२१ मार्च २००१४ ला झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर 

निकाल पाहण्यासाठी :

Wednesday, 21 May 2014

जिल्हा परिषद एकलहरेची घेतली दैनिक सकाळने दखल...

30 एप्रिल २०१४ :
आंबेगाव तालुक्यातील एकलहरे (ता.आंबेगाव ) शाळेची ५ सप्टेंबर १९५१ रोजी स्थापना झाली.दगड मातीची कौलारू इमारत, हीच या शाळेची ओळख होती. तिचेच रुपांतर आता भव्य दिव्य अश्या प्रशस्त इमारतीत झाले आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती सकाळच्या वृत्तपत्रातून....

Thursday, 1 May 2014

कार्यवाही प्रशासकीय बदल्यांची - आवर्जून पहा.

२ मे २०१४ :
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर, उपशिक्षक प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून संबंधित पदांची बदली बाबत माहिती घेण्यासाठी खालील पदावर क्लिक करून संबधित pdf  फाईल चेक करा.

केंद्रप्रमुख :-

  1. केंद्रप्रमुख_एकाच शाळेवर रुजू असलेले_फाईल_१ 
  2. केंद्रप्रमुख_आदिवासी क्षेत्रात काम करणारे_शिक्षक_२
  3. केंद्रप्रमुख_सेवाजेष्ठता यादीनुसार_विभाग_३

मुख्याध्यापक :-

  1. मुख्याध्यापक_एकाच शाळेत जास्त सेवा झालेले कर्मचारी_फाईल_१
  2. मुख्याध्यापक_आदिवासी क्षेत्रात काम करणारे_फाईल_२
  3. मुख्याध्यापक_एकाच तालुक्यात जास्त सेवा_फाईल_३

पदवीधर :-

  1. पदवीधर_एकाच शाळेवर जास्त सेवा झालेले_फाईल_१
  2. पदवीधर_एकाच_तालुक्यात_जास्त-सेवा_झालेले_फाईल_२
  3. पदवीधर_आदिवासी_क्षेत्रात_काम_करणारे_फाईल_३
उपशिक्षक :-


Wednesday, 16 April 2014

सज्ज आहोत लोकसभा निवडणुकीच्या जबाबदारीसाठी

१६ एप्रिल २०१४ :
कोणत्याही निवडणुका असल्या कि त्या सक्षमपने पार पाडण्याची खूप मोठी जबाबदारी सरकारवर (निवडणूक आयोगावर )असते. यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदान केंद्र असते आणि त्या ठिकाणी एक हुशार, तल्लख, योग्य निर्णय घेणारी व्यक्ती अपेक्षित असते. अश्या हजारो लोकांचा तुटवडा भरण्यासाठी गावोगावी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे योगदान देणारे शिक्षक सज्ज झाले आहेत २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीसाठी....
       आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील पॉलिटेक्निक इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये निवडणूक आयोगाचे केंद्र केले असून नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर प्रत्येक व्यक्तीला  पोहचविण्याची सोय करण्यात आली आहे. 










Saturday, 5 April 2014

आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी श्री.संजय नाईकडे यांचे पनवेल येथील व्याख्यान...

आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी श्री.संजय नाईकडे यांचे पनवेल येथील मार्गदर्शनपर व्याख्यान  आवर्जून ऐका...

Sunday, 23 March 2014

"शिक्षकांच्या परिश्रमांमुळे यश प्राप्त झाले"- गटशिक्षणाधिकारी नाईकडे साहेबांचे पनवेल येथे उदगार

आंबेगाव गटशिक्षणाधिकारी मां.श्री. संजय नाईकडे यांना पनवेल येथील पंचायत सामिती शिक्षण विभागच्या सर्व शिक्षकांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळेस त्यांनी व्याख्यानामध्ये आंबेगाव शिक्षण विभागाच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमांमुळे यश प्राप्त झाले. विकासामध्ये सुद्धा नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात. या व्याख्यानाची लवकरच व्हिडीओक्लिप सादर केली जाईल. तत्पूर्वी काही क्षणचित्रे सविनय सादर...








आंबेगाव तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न






महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यानुसार आंबेगाव तालुक्यात ४ थी साठी १९ केंद्रांवर २९९० विद्यार्थी व इयत्ता ७ वी च्या ९ केंद्रावर १८५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. असे आंबेगावचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे  यांनी सांगितले.
       यावर्षी प्रथमच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना केंद्रसंचालक म्हणून नियुक्त केले होते. गटविकास अधिकारी विवेक इलमे व गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी घोडेगाव, अवसरी खुर्द, पारगाव, वळती, पिंपळगाव, मंचर, रांजणी, चांडोली इ. परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच विस्तार अधिकारी सुनील सूर्यवंशी, रामदास पालेकर, के.के.जारकड, कमल जाधव, मालती आढारी व सर्व केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, विशेष शिक्षक यांनी सर्व केंद्रांना भेटी दिल्या. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. 

Saturday, 15 February 2014

शिक्षण विभागातील दोन शाळांना आय.एस.ओ. मानांकन

१६ फेब्रुवारी २०१४ :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदोली खुर्द (www.zpchandolikh.co.in)  आणि  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लौकी या दोन्ही शाळांना आय.एस.ओ.चे मानांकन प्राप्त झाले त्या संदर्भातील या बातम्या....


शिक्षण विभागाच्याच्या अंतर्गत विविध केंद्रांचे केंद्र संमेलन उत्साहात पार पडले.

शनिवार १५ फेब्रुवारी २०१४ :
प्रत्येक माहिन्याच्या एका शनिवारी शिक्षण विभागाच्या २३ केंद्रामध्ये केंद्रसंमेलन पार पडते. महिन्यातून एकदा तरी प्रत्येक शिक्षकाने एकमेकांना भेटावे आपले विचार विनिमय करावा, काही नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत हितगुज करावे. शिक्षण विभागामधील घडामोडी जाणून घ्याव्यात. या सारखी कामे या विभागांतर्गत पार पडतात. या केंद्रामधीलच एक केंद्र चांदोली खुर्द मध्ये जे केंद्रसंमेलन झाले त्याचा हा भाग :




Tuesday, 28 January 2014

पंचायत समिती आंबेगाव च्या वतीने ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा

26 जानेवारी २०१४ :


पंचायत समिती आंबेगाव च्या वतीने ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
 सकाळी ७.३० वाजता सभापती मा.कैलासबुवा काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी उपसभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी विवेक इलमे, पंचायत समिती सदस्य,जि.प.सदस्य,विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी जि.प.घोडेगाव च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली.

Friday, 17 January 2014

नालंदा शाळेचे नंदकिशोरा हे गाणे आवर्जून पहा...

शिवगिरी मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या समूहनृत्य स्पर्धेमधील.. नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे हे गीत 

मा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समूहनृत्य स्पर्धा...

मा.श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवासानिमित्त विविध ठिकाणी समूहनृत्य स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.
प्रथम गटपातळीवर आणि मग नंतर तालुका पातळीवर या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.
त्यापैकीच काही व्हिडीओ शिक्षणविभागच्या माध्यमातून ऑनलाईन टाकण्यात आले आहेत जेणे करून त्या व्हिडीओ आपणाला पाहण्यास सोयीस्कर होतील.
१) काठी नि घोंगड
२) मन रानात गेलं गं...
३) मारीआम्मा...मारीआम्मा...
४) मै. नाचू सारी सारी रात....

Monday, 13 January 2014

विज्ञान प्रदर्शनामध्ये मोढवे दाम्पत्य प्रथम...

जिल्हा परिषद शाळा :- महाळुंगे पडवळ - अरविंद  मोढवे
जिल्हा परिषद शाळा :- कानसे - सुवर्णा मोढवे 
यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दाखविली चुणूक आणि पटकाविला प्रथम क्रमांक त्यांचे शिक्षण विभाग आंबेगाव च्या वतीने हार्दिक अभिनंदन..!!! 




पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सौ. सुवर्णा अरविंद मोढवे यांचा द्वितीय क्रमांक

      
दि. ६ जानेवारी ते ८ जानेवारी २०१४ रोजी जिल्हास्तरीय विद्न्न्यान प्रदर्शनाचे आयोजन पी.के. टेक्निकल इन्स्टिट्यूट चाकण येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानसे येथील उपशिक्षिका सौ. सुवर्णा अरविंद मोढवे यांचा प्राथमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण या गटात द्वितीय क्रमांक आला आहे. त्यांनी खेळातून लोकसंख्या शिक्षण हा प्रकल्प सादर केला. त्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी खेद तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. दहिफळे, मा.महेश काकडे, उपसचिव महाराष्ट्र राज्य, डॉ. सारंग जोशी खेड तालुक्याचे सभापती, उपसभापती, गटशिक्षणाधिकारी सोनावणे  मॅडम उपस्थित होत्या.
       या बद्दल आंबेगाव तालुक्याचे शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री. संजय नाईकडे, विस्तार अधिकारी सौ. मालती आढारी , केंद्रप्रमुख सुभाष करवंदे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्ता वाळूंज, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नंदकुमार येवले व मुख्याध्यापक नयना अभंगकर यांनी अभिनंदन केले.