आंबेगाव गटशिक्षणाधिकारी मां.श्री. संजय नाईकडे यांना पनवेल येथील पंचायत सामिती शिक्षण विभागच्या सर्व शिक्षकांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळेस त्यांनी व्याख्यानामध्ये आंबेगाव शिक्षण विभागाच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमांमुळे यश प्राप्त झाले. विकासामध्ये सुद्धा नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात. या व्याख्यानाची लवकरच व्हिडीओक्लिप सादर केली जाईल. तत्पूर्वी काही क्षणचित्रे सविनय सादर...
ambegaoneduheader
Sunday, 23 March 2014
आंबेगाव तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ४ थी
व इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.
त्यानुसार आंबेगाव तालुक्यात ४ थी साठी १९ केंद्रांवर २९९० विद्यार्थी व इयत्ता ७
वी च्या ९ केंद्रावर १८५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. असे आंबेगावचे
गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी
सांगितले.
यावर्षी प्रथमच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना
केंद्रसंचालक म्हणून नियुक्त केले होते. गटविकास अधिकारी विवेक इलमे व
गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी घोडेगाव, अवसरी खुर्द, पारगाव, वळती, पिंपळगाव, मंचर, रांजणी, चांडोली इ. परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच विस्तार अधिकारी सुनील
सूर्यवंशी, रामदास पालेकर, के.के.जारकड, कमल जाधव, मालती आढारी व सर्व
केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, विशेष शिक्षक यांनी सर्व केंद्रांना भेटी दिल्या.
सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.
Subscribe to:
Posts (Atom)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)