ambegaoneduheader
Saturday, 15 February 2014
शिक्षण विभागाच्याच्या अंतर्गत विविध केंद्रांचे केंद्र संमेलन उत्साहात पार पडले.
शनिवार १५ फेब्रुवारी २०१४ :
प्रत्येक माहिन्याच्या एका शनिवारी शिक्षण विभागाच्या २३ केंद्रामध्ये केंद्रसंमेलन पार पडते. महिन्यातून एकदा तरी प्रत्येक शिक्षकाने एकमेकांना भेटावे आपले विचार विनिमय करावा, काही नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत हितगुज करावे. शिक्षण विभागामधील घडामोडी जाणून घ्याव्यात. या सारखी कामे या विभागांतर्गत पार पडतात. या केंद्रामधीलच एक केंद्र चांदोली खुर्द मध्ये जे केंद्रसंमेलन झाले त्याचा हा भाग :

Tuesday, 28 January 2014
पंचायत समिती आंबेगाव च्या वतीने ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा
26 जानेवारी २०१४ :
पंचायत समिती आंबेगाव च्या वतीने ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात
आला.
सकाळी ७.३० वाजता सभापती मा.कैलासबुवा काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.या वेळी उपसभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी विवेक इलमे, पंचायत समिती
सदस्य,जि.प.सदस्य,विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी
जि.प.घोडेगाव च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली.
Friday, 17 January 2014
नालंदा शाळेचे नंदकिशोरा हे गाणे आवर्जून पहा...
शिवगिरी मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या समूहनृत्य स्पर्धेमधील.. नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे हे गीत
मा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समूहनृत्य स्पर्धा...
मा.श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवासानिमित्त विविध ठिकाणी समूहनृत्य स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.
प्रथम गटपातळीवर आणि मग नंतर तालुका पातळीवर या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.
त्यापैकीच काही व्हिडीओ शिक्षणविभागच्या माध्यमातून ऑनलाईन टाकण्यात आले आहेत जेणे करून त्या व्हिडीओ आपणाला पाहण्यास सोयीस्कर होतील.
१) काठी नि घोंगड
२) मन रानात गेलं गं...
३) मारीआम्मा...मारीआम्मा...
४) मै. नाचू सारी सारी रात....
प्रथम गटपातळीवर आणि मग नंतर तालुका पातळीवर या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.
त्यापैकीच काही व्हिडीओ शिक्षणविभागच्या माध्यमातून ऑनलाईन टाकण्यात आले आहेत जेणे करून त्या व्हिडीओ आपणाला पाहण्यास सोयीस्कर होतील.
१) काठी नि घोंगड
Monday, 13 January 2014
पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सौ. सुवर्णा अरविंद मोढवे यांचा द्वितीय क्रमांक
दि. ६
जानेवारी ते ८ जानेवारी २०१४ रोजी जिल्हास्तरीय विद्न्न्यान प्रदर्शनाचे आयोजन
पी.के. टेक्निकल इन्स्टिट्यूट चाकण येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा कानसे येथील उपशिक्षिका सौ. सुवर्णा अरविंद मोढवे यांचा
प्राथमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण या गटात द्वितीय क्रमांक आला आहे. त्यांनी
खेळातून लोकसंख्या शिक्षण हा प्रकल्प सादर केला. त्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानपत्र
देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी खेद तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माध्यमिक
शिक्षणाधिकारी मा. दहिफळे, मा.महेश काकडे, उपसचिव महाराष्ट्र राज्य, डॉ. सारंग
जोशी खेड तालुक्याचे सभापती, उपसभापती, गटशिक्षणाधिकारी सोनावणे मॅडम उपस्थित होत्या.
या बद्दल
आंबेगाव तालुक्याचे शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री. संजय नाईकडे,
विस्तार अधिकारी सौ. मालती आढारी , केंद्रप्रमुख सुभाष करवंदे पुणे जिल्हा
प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्ता वाळूंज, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नंदकुमार
येवले व मुख्याध्यापक नयना अभंगकर यांनी अभिनंदन केले.
Subscribe to:
Posts (Atom)