ambegaoneduheader

Sunday, 23 March 2014

"शिक्षकांच्या परिश्रमांमुळे यश प्राप्त झाले"- गटशिक्षणाधिकारी नाईकडे साहेबांचे पनवेल येथे उदगार

आंबेगाव गटशिक्षणाधिकारी मां.श्री. संजय नाईकडे यांना पनवेल येथील पंचायत सामिती शिक्षण विभागच्या सर्व शिक्षकांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळेस त्यांनी व्याख्यानामध्ये आंबेगाव शिक्षण विभागाच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमांमुळे यश प्राप्त झाले. विकासामध्ये सुद्धा नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात. या व्याख्यानाची लवकरच व्हिडीओक्लिप सादर केली जाईल. तत्पूर्वी काही क्षणचित्रे सविनय सादर...








आंबेगाव तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न






महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यानुसार आंबेगाव तालुक्यात ४ थी साठी १९ केंद्रांवर २९९० विद्यार्थी व इयत्ता ७ वी च्या ९ केंद्रावर १८५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. असे आंबेगावचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे  यांनी सांगितले.
       यावर्षी प्रथमच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना केंद्रसंचालक म्हणून नियुक्त केले होते. गटविकास अधिकारी विवेक इलमे व गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी घोडेगाव, अवसरी खुर्द, पारगाव, वळती, पिंपळगाव, मंचर, रांजणी, चांडोली इ. परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच विस्तार अधिकारी सुनील सूर्यवंशी, रामदास पालेकर, के.के.जारकड, कमल जाधव, मालती आढारी व सर्व केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, विशेष शिक्षक यांनी सर्व केंद्रांना भेटी दिल्या. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. 

Saturday, 15 February 2014

शिक्षण विभागातील दोन शाळांना आय.एस.ओ. मानांकन

१६ फेब्रुवारी २०१४ :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदोली खुर्द (www.zpchandolikh.co.in)  आणि  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लौकी या दोन्ही शाळांना आय.एस.ओ.चे मानांकन प्राप्त झाले त्या संदर्भातील या बातम्या....


शिक्षण विभागाच्याच्या अंतर्गत विविध केंद्रांचे केंद्र संमेलन उत्साहात पार पडले.

शनिवार १५ फेब्रुवारी २०१४ :
प्रत्येक माहिन्याच्या एका शनिवारी शिक्षण विभागाच्या २३ केंद्रामध्ये केंद्रसंमेलन पार पडते. महिन्यातून एकदा तरी प्रत्येक शिक्षकाने एकमेकांना भेटावे आपले विचार विनिमय करावा, काही नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत हितगुज करावे. शिक्षण विभागामधील घडामोडी जाणून घ्याव्यात. या सारखी कामे या विभागांतर्गत पार पडतात. या केंद्रामधीलच एक केंद्र चांदोली खुर्द मध्ये जे केंद्रसंमेलन झाले त्याचा हा भाग :




Tuesday, 28 January 2014

पंचायत समिती आंबेगाव च्या वतीने ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा

26 जानेवारी २०१४ :


पंचायत समिती आंबेगाव च्या वतीने ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
 सकाळी ७.३० वाजता सभापती मा.कैलासबुवा काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी उपसभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी विवेक इलमे, पंचायत समिती सदस्य,जि.प.सदस्य,विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी जि.प.घोडेगाव च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली.

Friday, 17 January 2014

नालंदा शाळेचे नंदकिशोरा हे गाणे आवर्जून पहा...

शिवगिरी मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या समूहनृत्य स्पर्धेमधील.. नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे हे गीत 

मा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समूहनृत्य स्पर्धा...

मा.श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवासानिमित्त विविध ठिकाणी समूहनृत्य स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.
प्रथम गटपातळीवर आणि मग नंतर तालुका पातळीवर या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.
त्यापैकीच काही व्हिडीओ शिक्षणविभागच्या माध्यमातून ऑनलाईन टाकण्यात आले आहेत जेणे करून त्या व्हिडीओ आपणाला पाहण्यास सोयीस्कर होतील.
१) काठी नि घोंगड
२) मन रानात गेलं गं...
३) मारीआम्मा...मारीआम्मा...
४) मै. नाचू सारी सारी रात....